Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ऑटो

OLX layoff: OLX ग्रुपने तब्बल 800 कर्मचाऱ्यांना केले निष्कासित, सांगितले 'हे' कारण

OLX Group ने सध्या 800 कर्मचाऱ्यांना निष्कासित केले असले तरी येणाऱ्या काळात आणखी कर्मचाऱ्यांची गच्छंती होऊ शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे. OLX ग्रुपच्या प्रवक्त्यांनी या निर्णयाची पुष्टी केली असून OLX Automobiles युनिट बंद केल्यानंतरचा हा परिणाम आहे असे सांगितले आहे.

Read More

MG India ची नवीन MG Astor SUV लवकरच होणार लाँच!

New MG Astor SUV: MG India लवकरच नवीन फीचर्ससह आपले कॉम्पॅक्ट MG Astor SUV मॉडेल बाजारात आणू शकते. MG Astor SUV मॉडेल हे SUV श्रेणीमधील सर्वात प्रगत मॉडेल असल्याचा दावा MG India कंपनीने केला आहे. याआधी कंपनीने Astor SUV भारतात 2011 मध्ये पहिल्यांदा लाँच केली होती.

Read More

Maruti Suzuki UV INVICTO: प्रीमियम कार INVICTO ची बुकिंग सुरु, मारुती सुझुकी पुढील महिन्यात करणार लाँच

Premium car INVICTO: देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकीने आपल्या प्रीमियम UV INVICTO चे बुकिंग सुरु केले आहे. मारुतीने 3-रो युटिलिटी व्हेइकल लाँच करण्यापूर्वी त्याचे बुकिंग (INVICTO प्री-लाँच) सुरू केले आहे. कंपनी नेक्सा प्लॅटफॉर्मद्वारे INVICTO ची विक्री करणार आहे. मारुतीच्या नेक्सा डीलरशीपला भेट देऊन किंवा नेक्साच्या वेबसाइटवरून तुम्ही प्रीमियम कार INVICTO ची बुकिंग करू शकता.

Read More

Ola S1 Loan Scheme: आता ओला S1 स्कुटर खरेदी करा झिरो डाऊनपेमेंटवर, कंपनीची 60 महिन्यांची कर्ज योजना

Ola S1 Loan Scheme: ओलाने S1 साठी आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एल अ‍ॅंड टी फायनान्स या कंपन्यांशी वाहन कर्जासाठी करार केला आहे. अशाच प्रकारे एथरने सुद्धा वाहन कर्ज योजना आणली आहे. त्याच पावलावर पाऊल ठेवून ओलाकडून कर्ज योजना आणण्यात आली आहे.

Read More

Hero MotoCorp ने नवीन Extreme 160R 4V प्रीमियम बाइक्सचे तीन प्रकार लाँच केलेत

Hero MotoCorp Launched New Bike: हिरो मोटोकॉर्प कंपनीच्या विक्रीमध्ये मे महिन्यात प्रचंड वाढ झालेली आपण पाहिली. ग्राहकांची आवड आणि गरज लक्षात घेता आता या कंपनीने या बाईकचे तीन व्हेरियंट लाँच केले आहेत. कंपनीच्या नवीन Xtreme 160R 4V प्रीमियम बाइकची किंमत 1 लाख 27 हजार रुपयांपासून सुरु होत आहे.

Read More

Volvo Electric SUV Car: व्होल्वोची इलेक्ट्रीक एसयूवी गाडी लाँच, सप्टेंबर महिन्यापासून डिलिव्हरी दिल्या जाणार

Bron Electric SUV C40 Recharge Launched: ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनेक कंपन्या देशात वेगाने इलेक्ट्रीक कार आणत आहेत. यामध्ये आता व्होल्वो कार इंडिया (Volvo car India) कंपनी देखील सहभागी झाली आहे. व्होल्वो कार इंडियाने भारतात बॉर्न इलेक्ट्रिक SUV C40 (Bron Electric SUV C40 Recharge) रिचार्ज कार लाँच केली.

Read More

Aether EV Scooter: आता इलेक्ट्रिक स्कूटर घेताना पैशांची चिंताच मिटली, अ‍ॅथेर एनर्जीचा बजाज फायनान्ससोबत करार

Aether EV Scooter: सामान्य कुटुंबातील ग्राहकांना स्कूटर घेतांना सुध्दा फार विचार करावा लागतो, स्कूटर घेण्यास लोन कुठून मिळेल? डाऊन पेमेंट किती करावा लागेल? महिन्याला किती EMI भरावा लागेल? तसेच कुठल्या बँकेकडून किती टक्के व्याजाने लोन मिळेल? मात्र आता स्कूटर घेतांना पैशांची चिंता मिटली आहे. कारण अ‍ॅथेर एनर्जीने आता बजाज फायनान्ससोबत करार केलेला आहे.

Read More

Honda कंपनीची 'ही' नवीन Scooter भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि नवीन फीचर्स

Honda Dio Scooter : Honda Motorcycle and Scooter ने भारतात आपले स्कूटर मॉडेल Honda Dio Scooter 2023 लॉन्च केले आहे. कंपनीच्या या मॉडेलची बऱ्याच दिवसांपासून ग्राहक वाट बघत होते. या मॉडेलची किंमत जवळपास 70211 रुपये आहे. या नवीन मॉडेलसह कंपनीने आपल्या ग्राहकांना होंडा स्मार्ट की सिस्टम दिली आहे.

Read More

Cars Sale: टाटा मोटर्सच्या गाड्यांची मे महिन्यात जोरदार विक्री, अल्ट्रोझ मॉडेल विक्रीच्या बाबतीत आघाडीवर

May Month Car Sale: गेल्या अनेक महिन्यांपासून चारचाकी गाड्यांच्या विक्रीचे प्रमाण वाढत आहे. यातच मे महिन्यात टाटा मोटर्स कंपनीच्या गाड्यांनी बाजी मारली. मे 2023 मध्ये, टाटा मोटर्स कंपनीने अल्ट्रोझ मॉडेलची मोठी विक्री केली. मे 2023 मध्ये टाटा मोटर्सच्या गाड्यांची एकूण 5420 युनिट्सची विक्री झाली, तर एप्रिल 2023 मध्ये एकूण 4658 युनिट्सची विक्री झालेली आहे.

Read More

Maruti MPV: येत्या 5 जुलैला मारुती लॉन्च करणार प्रीमियम MPV; 20 लाखापासून सुरू होणार किंमत

Maruti Premium MPV: मारुती सुझुकी इंडिया 5 जुलै रोजी आपले नवीन प्रीमियम वाहन MPV लाँच करीत आहे. मारुतीची ही एमपीव्ही पूर्णपणे टोयोटा इनोव्हा हायक्रॉस सारखी नसून, त्यामध्ये बाहेरील स्ट्रक्चरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहे. ही प्रीमियम एमपीव्ही मारुती नेक्सा डीलरशिपद्वारे विकली जाणार आहे.

Read More

Two Wheeler Sales: टू-व्हीलरची ओला कंपनी विक्रीमध्ये आघाडीवर, मे महिन्यात इतर कंपन्यांही केली जोरदार विक्री

Electric Two Wheeler Sales: 1 जून पासून इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या किंमतीमध्ये वाढ झाली. परंतु, तरीदेखील ग्राहकांची सगळ्यात जास्त पसंती इलेक्ट्रिक टू व्हीलरलाच दिसून आली. यात ओला कंपनीने बाजी मारली. FADA च्या रिपोर्टनुसार, मे 2023 मध्ये एकूण 104829 इलेक्ट्रिक टू व्हीलरची विक्री झाली. तर एप्रिल 2023 मध्ये,एकूण 66466 युनिट्स विक्री झाली.

Read More

Mercedes-Benz : मर्सिडीजने 2.55 कोटी रुपयांच्या दोन नवीन जी-क्लास एसयूव्ही लाँच केल्या

Mercedes Launched Two New Cars : 40 वर्षांहून अधिक काळापेक्षा ग्राहकांच्या मनावर राज्य करणारी जर्मन कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझने भारतात नवीन जी-क्लास एएमजी लाइन आणि अॅडव्हेंचर एडिशन लॉन्च केले आहे. या दोन्ही कार एकाच एक्स-शोरूम किमतीत लाँच केल्या गेल्या आहेत, या कारची किंमत 2.55 कोटी रुपये आहे.

Read More